Join us  

मुंबई : आंतरराष्टीय विमानतळावरून तब्बल ५० किलो सोने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 4:18 AM

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्टीय विमानतळावरील सहार हवाई मालवाहतूक विभागातील कुरियर टर्मिनलमधून १५ कोटींचे ५० किलो सोने गुरुवारी जप्त केले. गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी कारवाई आहे.

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्टीय विमानतळावरील सहार हवाई मालवाहतूक विभागातील कुरियर टर्मिनलमधून १५ कोटींचे ५० किलो सोने गुरुवारी जप्त केले. गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. दुबईतून या सोन्याची तस्करी करण्यात आली असून ते गुजरातमध्ये पाठविण्यात येणार होते अशी माहिती समोर येत आहे.डीएचएल कुरिअर कंपनीतून हे कुरिअर पाठविण्यात आले होते. मात्र कुरिअरवरीलपत्ताही खोटा असल्याचे समजते. आॅटोमोबाइलच्या मेटल पार्टमध्ये हे सोने लपवून काळ्या आवरणाने झाकण्यात आले होते. गुरुवारी विमानतळावरील सहार हवाई मालवाहतूक विभागातील कुरियर टर्मिनलमधून आलेले हे कुरिअर स्कॅन झाले. डीआरआयच्या अधिकाºयांना संशय आल्याने त्यांनी बॉक्सची झडती घेतली. तेव्हा त्यातील मेटलच्या आॅटोमोबाइल पार्टवरील काळे आवरण दूर करताच एका पार्टमधून सोने निदर्शनास आले. अशा २० भांड्यांतून हे सोने जप्त करण्यात आले आहे. या कारवाईतून तब्बल १५ कोटी किमतीचे ५० किलो सोने जप्त करण्यात आले आहे.एकच तस्कर असल्याची शक्यता-दिल्ली आणि बंगळुरू विमानतळावर नुकत्याच केलेल्या कारवाईमध्येही अशाच प्रकारे सोन्याची तस्करी करण्यात आली होती. त्यामुळे यातील तस्कर एकच असल्याचा संशय डीआरआयला आहे.

टॅग्स :सोनंविमानतळमुंबई