Join us

मुंबई ४०.९ अंश; रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:06 IST

मुंबई : मुंबईत दाखल झालेल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असून, शनिवारी मुंबईच्या कमाल तापमानाची नोंद ४०.९ अंश सेल्सिअस एवढी ...

मुंबई : मुंबईत दाखल झालेल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असून, शनिवारी मुंबईच्या कमाल तापमानाची नोंद ४०.९ अंश सेल्सिअस एवढी झाली. यंदाच्या माेसमातील हा कमाल तापमानाचा उच्चांक असून, आतापर्यंत मुंबईत सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद ही २८ मार्च १९५६ साली होती. तेव्हा कमाल तापमान ४१.७ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी येथील कमाल तापमानाची नोंद ३८ अंशाच्या आसपास होते आहे. मुंबईत शनिवारी झालेल्या ४० अंशाच्या नोंदीने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. शनिवारी मालेगाव, पुणे, नाशिक, परभणी, जालना, औरंगाबाद, सांगली, सोलापूर, जळगाव, सातरा, अकोला आणि चंद्रपूर येथे देखील कमाल तापमान सर्वाधिक नोंदविण्यात आले असून, पुढील काही दिवस वातावरण असेच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

शनिवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई ४०.९

मालेगाव ३९.८

पुणे ३८.१

नाशिक ३८.२

परभणी ३९.५

जालना ३८

औरंगाबाद ३८.२

सांगली ३८.२

सोलापूर ४०.४

जळगाव ४०.४

सातारा ३८

अकोला ४०.४

चंद्रपूर ४१.२

अमरावती ३९

गडचिरोली ३९