पारा घसरला : थंडीचा जोर वाढू लागला
मुंबई : उत्तरेकडून दक्षिणोकडे वाहणा:या थंड वा:याने वेग घेतल्याने राज्यासह मुंबईतल्या किमान तापमानाचा पारा खाली घसरत आहे. परिणामी राज्य आणि मुंबईत थंडीचा जोर हळूहळू वाढत असून, गुरुवारी मुंबई शहराचे किमान तापमान 18.2 अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.
नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक कमी तापमान नोंदविण्यात येण्याची ही दुसरी वेळ असून, यापूर्वी 22 नोव्हेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. दरम्यान, हवामानातील चढउतारामुळे किमान तापमान पुन्हा 21 अंशावर पोहोचले होते.
ते गुरुवारी पुन्हा खाली घसरले आहे. मुळात उत्तरेकडून वाहणा:या थंड वा:याचा वेग जसजसा वाढू लागेल; तसतसे राज्यासह मुंबईचे
किमान तापमान आणखी
खाली घसरेल आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात मुंबईचे
किमान तापमान 12 अंशावर येऊन ठेपेल, असे हवामान खात्याचे अनुमान आहे.
दरम्यान, भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)
अहमदनगर गारठले
राज्य : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
पुणो : आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 3क्, 13 अंशाच्या आसपास राहील.
मुंबई : आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35, 18 अंशाच्या आसपास राहील.
गुरुवारी राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे
1क्.3 अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.
प्रमुख शहरांचे किमान
तापमान अंश सेल्सिअसमध्ये
पुणो 11.7, जळगाव 11.8, महाबळेश्वर 14.6, मालेगाव 14.2, नाशिक 11.5, सातारा 11.7, औरंगाबाद 13.8, परभणी 13.6, अकोला 13.9, गोंदिया 1क्.8, नागपूर 12.7, वर्धा 13.8, यवतमाळ 13.4.