मुंबई : मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा थंड वारे वाहू लागले असून, नाशिक येथे सर्वांत कमी ८.५ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविण्यात आले. मुंबईतही थंडीने पुन्हा जोर पकडला असून, तापमान १३ अंशांवर आले आहे. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईचे किमान तापमान ११ अंशावर घसरले होते. सलग चार ते पाच दिवस किमान तापमान ११ ते १३ अंशादरम्यान राहिल्याने मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली होती. मात्र त्यानंतर तापमानात पुन्हा वाढ झाली होती. आता पुन्हा किमान तापमानात घट झाल्याने थंडीचा जोर वाढला असून, पुढील २४ तासांसाठी सर्वसाधारण हीच परिस्थिती राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)
मुंबई @ १३.२ अंश
By admin | Updated: January 4, 2016 03:24 IST