Join us  

मुलुंडमध्ये माजी महापौरांचा मुलगा अपक्ष म्हणून रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 3:24 AM

मुलुंड विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने, माजी महापौर आर.आर. सिंग यांचा मुलगा डॉ. राजेंद्रप्रसाद सिंग यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.

मुंबई : मुलुंड विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने, माजी महापौर आर.आर. सिंग यांचा मुलगा डॉ. राजेंद्रप्रसाद सिंग यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्याऐवजी काँग्रेसकडून गोविंद सिंग यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मुलुंडमध्ये आर.आर. सिंग हे १९७३ ते २००३ पर्यंत नगरसेवक होते. त्यानंतर, ९३ आणि ९४ मध्ये त्यांनी मुंबईचे महापौर पद भूषविले आहे. ते मुंबईचे प्रभारी काँग्रेस अध्यक्ष होते़ अपक्ष नेतेपदाची जबाबदारीही त्यांनी पेलली आहे. राजेंद्रप्रसाद यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसकडून मलाच उमेदवारी दिल्याचे सांगितले. ए/बी फॉर्म न मिळाल्याने गुरुवारी मी अपक्ष म्हणून अर्ज भरला. शुक्रवारी अखेरच्या क्षणाला अन्य उमेदवाराला संधी मिळाली, म्हणून मीदेखील अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या विचारात आहे. पुढे पक्ष काय भूमिका घेतो, यावर अर्ज मागे घ्यायचा की नाही याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. कुठेतरी काँग्रेसच्या खऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मुलुंड