Join us

मुलुंड, कांजूरमार्गला तूर्त डम्पिंग

By admin | Updated: November 25, 2014 02:27 IST

मुलुंड व कांजूरमार्ग येथे डम्पिंग करण्यास उच्च न्यायालयाने महापालिकेला तूर्त परवानगी दिली आह़े

मुंबई : मुलुंड व कांजूरमार्ग येथे डम्पिंग करण्यास उच्च न्यायालयाने महापालिकेला तूर्त परवानगी दिली आह़े यामुळे पालिकेला दिलासा मिळाला असला तरी डम्पिंगसाठी पर्यायी जागा लवकरात लवकर शोधा, असे आदेशही न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत़ 
हे ग्राउंड सीआरङोड क्षेत्रत येते व याने पर्यावरणाचा :हास होत असल्याने न्यायालयाने पालिकेला येथे डम्पिंग करण्यास मनाई केली होती़ तसेच डम्पिंगसाठी पर्यायी जागा शोधण्याचे निर्देशही दिले होत़े त्यानुसार पालिकेने यासाठी शासनाकडे अर्ज केला़ मात्र या अर्जावर निर्णय न झाल्याने मुलुंड व कांजूरमार्ग येथे डम्पिंगला परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज पालिकेने न्यायालयात केला़ त्याची दखल घेत न्यायालयाने वरील आदेश दिले व ही सुनावणी चार आठवडय़ांसाठी तहकूब केली़