Join us

महावितरणकडून महिला सरपंचांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:05 IST

मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महावितरण, भांडुप परिमंडळाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात येईल. ज्या महिला तंत्रज्ञांनी ...

मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महावितरण, भांडुप परिमंडळाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात येईल. ज्या महिला तंत्रज्ञांनी कृषी वीजबिल थकबाकी वसुलीत आपले विशेष योगदान दिले, तसेच ज्या महिला सरपंचांनी ग्रामपंचायतीत शेतकऱ्यांना कृषी धोरणाबद्दल माहिती देऊन व त्याचे फायदे पटवून त्यांना वीजबिल थकबाकी भरण्यासाठी प्रोत्साहन दिले, अशा महिला सरपंचांचा सन्मान करण्यात येईल

----------------

‘सक्षमीकरणातून निर्भयतेकडे’ अंतर्गत जनजागृतीपर माहिती

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात जागतिक महिला दिनानिमित्त सक्षमीकरणातून निर्भयतेकडे या विषयावर महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवारी सकाळी ७.२५ वाजता प्रसारित होईल. महिला धोरण, बालविवाहाचे समाजातील प्रमाण कमी करण्यासाठीचे प्रयत्न, मनोधैर्य योजना, निराश्रित महिलांसाठी सुरू केलेली आधारगृहे आदी विषयांची जनजागृतीपर माहिती या कार्यक्रमात आहे.

...............................