Join us

एमआरव्हीसीची मुख्यमंत्र्यांकडे धाव

By admin | Updated: December 9, 2014 02:55 IST

(एमआरव्हीसी) पाचव्या मार्गात एका पाऊलवाटेचा अडथळा येत आहे. स्थानिकांनी ही पाऊलवाट तोडण्यास विरोध केल्याने हा मार्ग पूर्ण करण्यास अनेक समस्या येत आहेत. त्या

मुंबई : सांताक्रूझ ते माहीम या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) पाचव्या मार्गात एका पाऊलवाटेचा अडथळा येत आहे. स्थानिकांनी ही पाऊलवाट तोडण्यास विरोध केल्याने हा मार्ग पूर्ण करण्यास अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे एमआरव्हीसीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेत यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. 
एमआरव्हीसीकडून एमयूटीपी-1 अंतर्गत सांताक्रूझ ते माहीम असा 60 कोटी रुपये खर्च करून पाचवा मार्ग तयार केला जात आहे. या मार्गामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा मार्ग मोकळा होण्याबरोबरच लोकल गाडय़ांचा मार्गही सुकर होण्यास मदत मिळणार आहे. या मार्गाचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र वांद्रय़ाजवळून जाणा:या या मार्गावर एक पाऊलवाट असून ती तोडून ट्रॅक टाकण्यास रेल्वेला स्थानिकांनी विरोध केला आहे. येथून स्थानिकांना पलीकडे सहजपणो जाता येत असल्याने त्याला विरोध करण्यात येत आहे. मात्र पर्याय म्हणून पाच मिनिटांच्या अंतरावरच रेल्वेकडून एक फाटक तयार करण्यात आले असून स्थानिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध केला आहे. मात्र तेथून जाण्यास स्थानिक तयार नसून या पाऊलवाटेचाच हट्ट धरला आहे. दोन वेळा ही पाऊलवाट तोडण्यासाठी गेलेल्या रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे पोलिसांनाही स्थानिकांनी विरोध केला. हे पाहता एमआरव्हीसी आणि पश्चिम रेल्वेने यावर तोडगा निघावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिका:याने सांगितले. याबाबत दहा दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)