Join us
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी विद्यार्थ्यांचा ‘आक्रोश’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 05:12 IST

राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध विभागातील रिक्त पदे भरली गेलेली नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी आझाद मैदानात विद्यार्थी ‘आक्रोश मोर्चा’ काढला.

मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध विभागातील रिक्त पदे भरली गेलेली नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी आझाद मैदानात विद्यार्थी ‘आक्रोश मोर्चा’ काढला.याआधी औरंगाबाद आणि पुण्यातही विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेसाठी अधिक पदांची भरती आयोजित करण्याची मागणी करत मोर्चा काढण्यात आले होते. या आक्रोश मोर्चात सर्वच विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी भरती घेण्याची मागणी करण्यात आली. शिक्षकांची रिक्त असलेली २४ हजार पदे तत्काळ भरून जिल्हा परिषद आणि महापालिका क्षेत्रातील शाळा बंद करू नये, अशी मागणी पुढे रेटण्यात आली.शासनाकडून आकारण्यात येणाºया भरमसाठी परीक्षा शुल्क कमी करण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांनी केले. सुशिक्षित बेरोजगारांना प्रतिमाह २ हजार रुपये निर्वाह भत्ता सुरू करण्याचे साकडे विद्यार्थ्यांनी प्रशासनाला घातले. पोलीस व नोक भरतीतील पद संख्येत वाढ करण्याची प्रमुख मागणीही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.