Join us
Daily Top 2Weekly Top 5

खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक; उद्या दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार

By मनोहर कुंभेजकर | Updated: November 19, 2023 23:32 IST

शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे आज  रात्री 8 वाजता मानखुर्द येथील राहत्या घरी निधन झाले.

मुंबई-शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे आज  रात्री 8 वाजता मानखुर्द येथील राहत्या घरी निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्या घरीच होत्या. मात्र आज सायंकाळी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना चेंबूरच्या साई रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्युसमयी त्या 73 वर्षांच्या होत्या.

 त्यांच्या पश्चात अविनाश शेवाळे, नवीन शेवाळे आणि खासदार राहुल शेवाळे अशी 3 मुले, वर्षा  शेवाळे, माजी नगरसेविका वैशाली शेवाळे, माजी नगरसेविका कामिनी शेवाळे या 3 सूना आणि एकूण 6 नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या  दुपारी 12 वाजता ट्रॉम्बे कोळीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.