Join us
Daily Top 2Weekly Top 5

खासदारकी सोडा, गृहमंत्रिपद सोडतो!

By admin | Updated: August 15, 2014 00:21 IST

आऱ आऱ पाटील : संजयकाकांना प्रतिआव्हान

नरेश मानकर - पांढरकडा  (जि. यवतमाळ) आर. आर. पाटलांनी आधी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, नंतरच विधानसभेची निवडणूक लढवावी, या भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्या आव्हानाला 'आधी संजय काका पाटलांनी खासदारकी सोडावी, गृहमंत्रिपद सोडतो’, असे प्रतिआव्हान गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी दिले. सांगलीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची स्थिती मजबूत असल्यानेच संजयकाका पाटील अस्वस्थ झाल्याची टीकाही गृहमंत्री पाटील यांनी केली. पांढरकवडा येथे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन व पोलीस कर्मचारी वसाहतीच्या उद्घाटनानिमित्त आलेल्या गृहमंत्र्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला़ ते म्हणाले, राज्य शासन शेवटच्या तीन महिन्यांत गतिमान झाले आहे़ ते आधीपासूनच गतिमान असते, तर अनेक योजना कार्यान्वित झाल्या असत्या, असा टोलाही अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना लावला.