दीपक मोहिते ल्ल वसई
सर्वाचा लाडका गणराया आता लवकरच समस्त भक्तगणांच्या घरी विराजमान होणार आहे. त्यानिमित्ताने आतापासून भक्तांना गणोशाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गणरायाचे स्वागत करण्यासाठी घरे-दारे सज्ज झाली असून रंगरंगोटी, देवखोलीची सजावट, पाट, चौरंग यासोबत इतर रोषणाईचीही सध्या तयारी जोरदार सुरू आहे. काही गणोशोत्सव मंडळांनी मोठय़ा मूर्ती आतापासूनच नेण्यास सुरूवात केली आहे.
गणोशोत्सवाला केवळ 1क् दिवस उरले असल्यामुळे मूर्तीकारांच्या कारखान्यांमध्ये गणोशाच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे. सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांच्या मूर्तीचे काम जवळपास सर्वच मूर्तीकारांनी
पूर्ण केले आहे, तर दुसरीकडे खाजगी
लहान गणोशमूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
मोठय़ा मूर्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे गणोशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आतापासूनच मूर्ती नेण्याच्या कामाला लागले आहेत. काही ठिकाणी मोठय़ा गाडींतून या मूर्तींची वाहतूक होताना दिसत आहे. नागरिक आपल्या गणोशमूर्तींचे काम न्याहाळण्यासाठी कार्यशाळांना भेटी देत आहेत.
सध्या पावसाने विo्रांती घेतल्यामुळे गणोशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते विविध कार्यात गुंतले आहेत. बाजारात आकर्षक मखरे विक्रीला आली आहेत. तयार मखरांमुळे आराशीची कामे झपाटय़ाने होत असल्यामुळे या मखरांना खूप मागणी आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मखराच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.