Join us

वीज कर्मचाऱ्यांचे प्रकाशगडावर आंदोलन

By admin | Updated: October 28, 2015 00:09 IST

महावितरण आणि महानिर्मितीच्या कामगार व वीज ग्राहक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी वांद्रे येथील

मुंबई : महावितरण आणि महानिर्मितीच्या कामगार व वीज ग्राहक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात महावितरणचे १६ झोन व महानिर्मितीच्या ९ वीजनिर्मिती केंद्रांतून हजारो आंदोलक सामील झाले होते.तत्कालीन विद्युत मंडळाचे दहा वर्षांपूर्वी विभाजन झाल्यानंतर निर्माण झालेल्या वीज कंपन्यांमध्ये वीज कर्मचारी वर्गाची गळचेपी सुरू आहे. आवश्यकता नसूनही खासगीकरणाचे धोरण अवलंबिले जात आहे. शिवाय रिक्त पदे भरली जात नाहीत, कंत्राटी पद्धतीला चालना दिली जात आहे. बैठका घेण्यात आल्या. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने, आंदोलन छेडण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)