Join us
Daily Top 2Weekly Top 5

छात्र भारतीचे अभाविपविरोधात आंदोलन

By admin | Updated: March 2, 2017 22:27 IST

गेल्या काही दिवसांपासून भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये भाजपप्रणित अभाविप या विद्यार्थी संघटनेकडून होत असणाऱ्या दमदाटीविरोधात

 मुंबई, दि. २  -  गेल्या काही दिवसांपासून भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये भाजपप्रणित अभाविप या विद्यार्थी संघटनेकडून होत असणाऱ्या  दमदाटीविरोधात छात्र भारतीने आज मरीन लाईन्स येथे मुक निदर्शने केली. गुरमेहर कौर या विधार्थीनीला बलात्काराची धमकी देणाऱ्या समाजकंटकांना सरकारने आवर घालवा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. गुरमेहर कौरच्या बाजूने सर्व पुरोगामी शक्तींनी उभे राहण्याची गरज असल्याचे छात्र भारतीतर्फे सांगण्यात आले. लोकशाहीवादी भारतात सर्वाना आपले मत मांडण्याचा अधिकार मिळावा, अभिव्यक्त होण्याचा मानवी हक्क मिळावा यासाठी छात्र भारती आग्रही आहे, असे छात्र भारतीचे राज्य उपाध्यक्ष सागर भालेराव यांनी यावेळी सांगितले. देशभक्ती - देशद्रोह हा विनाकारण वाद उभा करून वाढती महागाई - बेरोजगारी, जातीयवाद या मूळ प्रश्नांना बगल देण्याचा हा प्रयन्त असल्याचा आरोप देखील सागर भालेराव यांनी केला. मरीन लाईन पोलिसांनी मुकपणे निदर्शने करणार्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना अटक केली व थोड्या वेळाने सोडून दिले. 

यावेळी छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे, लोकेश लाटे, विदयापीठ संघटक रोहीत ढाले, केतकी महाजन, अंकिता काकडे, अनिता इदे, भगवान बोयाळ आदी छात्र भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.