Join us  

सरकारविरोधात ‘चले जाव’ आंदोलन छेडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 3:15 AM

आॅगस्ट क्रांतीच्या स्मृती जागविताना, स्वराज्याचे सुराज्य झालेल्या या देशात आज सामान्य गोर-गरीब माणसांच्या हितरक्षणाकडे सरकारचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. म्हणूनच संघर्षाचा नारा घेऊन समविचारी पक्षांसोबत सरकारला ‘चले जाव’चा इशारा देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

मुंबई : आॅगस्ट क्रांतीच्या स्मृती जागविताना, स्वराज्याचे सुराज्य झालेल्या या देशात आज सामान्य गोर-गरीब माणसांच्या हितरक्षणाकडे सरकारचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. म्हणूनच संघर्षाचा नारा घेऊन समविचारी पक्षांसोबत सरकारला ‘चले जाव’चा इशारा देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई सेंट्रल ते गवालिया टँक अभिवादन रॅली काढण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.भारतीय स्वातंत्र्य समरातशहीद झालेल्या जवानांना या मूक अभिवादन मिरवणुकीद्वारे मानवंदना देण्यात आली. मिरवणुकीमध्येमुंबईचे गिरणी कामगार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. मिरवणूक गवालिया टँक मैदानावर आल्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला अध्यक्षा चित्रा वाघ, रा. मि. म. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते आदींनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. मिरवणुकीचे रूपांतर अभिवादन सभेत झाले. फसवी आश्वासने देत सत्तेवर आलेल्या सरकारविरुद्ध समविचारींनी एकत्रित रस्त्यावर उतरण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी या वेळी केले.जयंत पाटील म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय असलेल्या काँग्रेसला उद्देशून काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा करणारे भाजपा स्वत: कधीही स्वातंत्र्यलढ्यात उतरले नाही.या वेळी पाटील यांनी बेरोजगारांना नोकरी, घरगुती गॅस सिलिंडरमध्ये केलेल्या दरवाढीवर सडकून टीका केली.

टॅग्स :जयंत पाटीलबातम्या