Join us

रस्त्यालगतचा ट्रान्सफॉर्मर हलवा

By admin | Updated: June 2, 2015 22:43 IST

छत्री केंद्र चौक ते मशीद रस्त्याच्या रुंदीकरणात याठिकाणी असलेला वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर अडथळा ठरत आहे. या ट्रान्सफॉर्मरमुळे वाहन अपघातांची

कर्जत : छत्री केंद्र चौक ते मशीद रस्त्याच्या रुंदीकरणात याठिकाणी असलेला वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर अडथळा ठरत आहे. या ट्रान्सफॉर्मरमुळे वाहन अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिकांसाठी धोकादायक असणारा ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या जागेत हलवावा, अशी मागणी स्थानिक नगरसेविका सुवर्णा जोशी यांनी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली आहे. या रस्त्यावर डॉ. परमार यांच्या दवाखान्यासमोर पूर्वी वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मर बसविला होता. मात्र हा ट्रान्सफॉर्मर आता रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरला आहे. आजूबाजूला मोठ्या इमारती असून ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला इमारत असल्याने या इमारतीच्या गॅलरीजवळून वीज वाहक तारा गेल्या आहेत. या गॅलरीत एक लहान मुलगी खेळत असताना तिला शॉक बसला होता. या घटनेला सात- आठ वर्षे झाली आहेत. सध्या ट्रान्सफॉर्मरभोवती इमारती झाल्याने तो धोकादायक ठरत आहे. हा विषय जोशी यांनी नगरपरिषदेच्या सभेत मांडला. त्यावेळी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी, तातडीने निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. तशा सूचना त्यांनी संबंधितांनाही दिल्या आहेत. (वार्ताहर )