Join us  

मुंबईतील स्टेट बॅंक कॉलनीत उदंड जाहले उंदीर, महापालिकेने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2017 6:53 PM

मुंबईतील विलेपार्ले (प) येथील स्टेट बँक कॉलनीतील सदनिकेत उंदरांच्या वाढत्या उपद्रवामुळे येथील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा केली व ताबडतोब उंदिरांबाबत तोडगा काढण्यासंदर्भात अपेक्षा व्यक्त केली. 

मुंबई, दि. 4 - मुंबईतील विलेपार्ले (प) येथील स्टेट बँक कॉलनीतील सदनिकेत उंदरांच्या वाढत्या उपद्रवामुळे येथील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा केली व ताबडतोब उंदिरांबाबत तोडगा काढण्यासंदर्भात अपेक्षा व्यक्त केली. हा विषय काही वृत्त वाहिन्या व वृत्तपत्रांनी 'उदंड जाहले उंदीर', 'उंदरांचा हैदोस' अशा मथळ्याखाली प्रसिद्ध केला होता. या सोसायटीतील एका घरातील उंदरांच्या प्रादुर्भावामुळे तेथील अन्य कुटुंबातील सदस्यांना दुर्गंधीमुळे शारीरिक व मानसिक त्रास होत आहे. याबाबत त्यांना पोलिसांकडे धाव घ्यावी लागली आहे. सोसायटीतील पदाधिका-यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. परंतु मागील 3 ते 4 वर्षांपासून या प्रश्नाचा पाठपुरावा सोसायटीचे पदाधिकारी करीत आहेत. येथील एका घरात काही नागरिकांच्या मानसिक स्थितीमध्ये काही समस्या असल्याने त्यांना स्वत:च्या घरातील 200 उंदरांचा त्रास वाटत नाही. परंतू या सोसायटीतील इतर रहिवाशांना त्रास होत आहे. परिणामी, महापालिकेच्या लोकांनी  कारवाई करताना पोलिसांच्या मदतीची अपेक्षा आवश्यक बनली आहे, असे सोसाटतील रहिवाशींनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महापालिकेच्यावतीने आजवर दोन तीन वेळा कारवाई  करण्यात आली आहे. मात्र, आणखी कारवाईची गरज आहे. याविषयी कायमची व बिळातून उंदिराचा सोसायटीच्या आवारातील संचारावर उपाययोजना करून  लेप्टो स्पायरोसिस सारख्या  कोणत्याही आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी महापालिका स्तरावर लवकरात लवकर उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा आ. डॉ. निलम गोऱ्हे यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे.दरम्यान,  विलेपार्ले (प) येथील स्टेट बँक सोसायटीतील उंदरांच्या समस्येवर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तात्काळ आ. डॉ. नीलम गो-हे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. याबाबत त्वरीत दखल घेतली असून सहायक महापालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांना कारवाई करण्याची सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :मुंबई