Join us  

आफ्रिकेतील माउंट किलीमांजारो पर्वतावर फडकले ७२ तिरंग्यांचे तोरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 2:48 AM

भारताच्या ७२व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘७२ भारतीय ध्वजांचे तोरण’ आफ्रि केतील सर्वोच्च शिखरावर फडकावण्याचा विक्रम मुंबईतील गिर्यारोहकांनी केला आहे.

मुंबई : भारताच्या ७२व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘७२ भारतीय ध्वजांचे तोरण’ आफ्रि केतील सर्वोच्च शिखरावर फडकावण्याचा विक्रम मुंबईतील गिर्यारोहकांनी केला आहे. गिरणगावातील गिर्यारोहक वैभव ऐवळे आणि सोलापूरचे डॉ. सुनील खट्टे या दोघांनी माउंट किलीमांजारो शिखरावर १५ आॅगस्ट रोजी सकाळच्या सुमारास ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत गायन करून ७२ ध्वजांचे तोरण फडकवत विक्रम केला.मोहिमेसाठी माझ्या आई-वडील आणि मित्रपरिवाराने सतत प्रेरित केले. माझे गुरू आनंद बनसोडे यांनी १५ आॅगस्ट २०१४ रोजी माउंट किलीमांजारो सर केला होता. त्यामुळे त्यांना गुरुदक्षिणा म्हणून हा विक्रम केला. स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या या मोहिमेला आम्ही संपूर्ण भारतीय नागरिकांना समर्पित करीत आहोत, असे वैभव आणि त्यांच्या टीमने सांगितले. दरम्यान, मोहिमेतून ‘#हम फिट तो इंडिया फिट, #सेव द गर्ल चाईल्ड, #ही फॉर शी’ हे हॅशटॅग वापरून सामाजिक मोहिमांसाठी प्रोत्साहन देण्यात आले. या वेळी मोहिमेत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे आणि अनिल वाघ यांची साथ वैभव आणि टीमला लाभली. 

टॅग्स :मुंबईबातम्या