Join us

वर्सोव्यात सराईत मोटरसायकल चोराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:06 IST

वर्सोव्यात सराईत मोटरसायकल चोराला अटकमुंबईत २५ गुन्हे दाखललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईताला शनिवारी ...

वर्सोव्यात सराईत मोटरसायकल चोराला अटक

मुंबईत २५ गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईताला शनिवारी वर्सोवा पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर जवळपास २५ गाड्या चोरल्याचा आरोप आहे.

अहाद ऊर्फ आदी अफजल शहा (२०) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो मेडिकलमधून औषध पोहोचविण्याचे काम करतो. अंधेरीच्या सात बंगला परिसरात ८ नोव्हेंबर, २०२० रोजी पार्क केलेली स्कुटी अज्ञात व्यक्तीने पळवून नेली. याची तक्रार वर्सोवा पोलिसांकडे करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक धायगुडे यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शहाला अटक केली. त्याने स्कुटी चोरल्याची कबुली दिली. तसेच अधिक चौकशीत गोरेगाव, मालाड, ओशिवरा, आंबोली, मेघवाडीमध्येही दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यानुसार अद्याप २ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या १० गाड्या पोलिसांनी हस्तगत केल्या. उर्वरित वाहनांचा शोध सुरू आहे.