Join us
Daily Top 2Weekly Top 5

माता न तू वैरिणी! आईनेच केली दीड महिन्यांच्या मुलीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:08 IST

नालासोपारा : वसईच्या पाचूबंदर येथे राहणाऱ्या आईनेच एका दीड महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली आहे. ...

नालासोपारा : वसईच्या पाचूबंदर येथे राहणाऱ्या आईनेच एका दीड महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली आहे. तिचा मृतदेह घरात असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये सापडला आहे. वसई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी आईविरोधात हत्येचा व पुरावा नष्ट केला म्हणून गुन्हा दाखल करून आरोपी आईला अटक केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसईच्या पाचूबंदर येथे दीड महिन्याच्या मुलीचा बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास पाण्याच्या टाकीमध्ये मृतदेह मिळाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. घरातले व आजूबाजूला राहणारे लोक दीड महिन्याची मुलगी सकाळपासून सापडली नसल्याने सर्वत्र शोधाशोध करत होते. काही जण तर तिचे अपहरण झाले असेल, असे बोलून पोलिसांना तक्रार करायला घरच्यांना सांगत होते. निर्मला यांची सासू वसई पोलीस ठाण्यात तक्रार करायला आल्यावर एक निनावी फोन आला की, तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला आहे. घरातले व वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला.

पाचूबंदर येथील किनारा हॉटेलच्या पुढे इतूर परिवार राहताे. या परिवारात सासू, पती, दीर भावजय आणि निर्मला इतूर मुलांसह राहत होते. निर्मला यांचे पती व दीर मासेमारीसाठी बोटीवर जातात. निर्मला यांनी दीड महिन्यांपूर्वी दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला होता. त्याच्या दिरालाही मुलीच होत्या. मुलगा झाला नाही म्हणून त्यांना त्रास दिला जायचा. जुळ्या मुली असल्याने एक मुलगी झोपायची, तर एक जागी राहायची. शेवटी, रोजच्या त्रासाला कंटाळून त्यांनी एका मुलीला बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरातील पाण्याच्या टाकीत टाकले. टाकीतील पाण्यात बुडून त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.