Join us
Daily Top 2Weekly Top 5

चौकजवळील निंबरवाडीत मातेने दिला तिळय़ांना जन्म

By admin | Updated: November 12, 2014 22:41 IST

चौकजवळील आदिवासी वाडीतील एका महिलेने ग्रामीण रुग्णालयात तिळय़ांना जन्म दिला आहे.

खालापूर : चौकजवळील आदिवासी वाडीतील एका महिलेने ग्रामीण रुग्णालयात तिळय़ांना जन्म दिला आहे.  
खालापूरच्या चौक मोरबे धरणाशेजारी असणा:या निंबरवाडी येथील राम बाळू पिरकत यांच्या पत्नी पार्वती यांना प्रसूतीसाठी बुधवारी पहाटे चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. पहाटे प्रसूती झालेल्या या महिलेने तीन अपत्यांना जन्म दिला आहे. 
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पंधरा मिनिटांच्या फरकाने ही बालके जन्मली आहेत. एकाचे वजन तीन पौंड तर दुस:याचे साडेतीन पौंड तर तिस:याचे वजन चार पौंड असून तीनही बालकांची तपासणी करण्यात आली आहे. तिघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (वार्ताहर)
 
1देवाची कृपा आपल्या कुटुंबावर झाल्याने मुलांची नावे ब्रम्हा, विष्णू आणि महेश अशी नावे ठेवण्याची इच्छा त्यांच्या वडिलांनी व्यक्त केली. तिळय़ांच्या जन्माची आदिवासीवाडीतील पहिलीच घटना आहे. 
 
2चौक ग्रामपंचायतीकडून आरोग्य उपचारासाठी नक्कीच मदत केली जाईल, असे आश्वासन सरपंच सचिन मते यांनी दिले. या बालकांना बघण्यासाठी परिसरातील नागरिक विशेषत: महिला, विद्याथ्र्यानी मोठी गर्दी केली होती.