Join us

म.रे.च्या बैठकीला बहुतेक खासदार अनुपस्थित

By admin | Updated: October 15, 2015 02:42 IST

उपनगरीय प्रवाशांना भेडसावणारे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि अनेक मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मध्य रेल्वेकडून २५ खासदारांना आमंत्रण देण्यात आले.

मुंबई : उपनगरीय प्रवाशांना भेडसावणारे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि अनेक मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मध्य रेल्वेकडून २५ खासदारांना आमंत्रण देण्यात आले. बुधवारी झालेल्या या बैठकीस फक्त सात खासदार हजर होते. या बैठकीला भाजपचे खासदार किरीट सोमय्या आणि कपिल पाटील, शिवसेनेचे अरविंद सावंत, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजिद मेनन व नामनिर्देशित खासदार भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते, तर भाजपचे तीन, शिवसेनचे सात, काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादीच्या एका खासदाराने पाठ फिरवली. नामनिर्देशित खासदारांपैकी खासदार ेसचिन तेंडुलकर, रेखा, जावेद अख्तर,अशोक गांगुली, रामदास आठवले हेसुद्धा अनुपस्थित होते. मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्लॅटफॉर्मची उंची, हार्बरचे बारा डबे, सर्व लोकल डब्यात सीसीटीव्ही बसविणे या मुद्द्यांवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)