Join us  

जून महिन्यात मध्य रेल्वेला सर्वाधिक ‘लेटमार्क’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 5:20 AM

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल जून महिन्यात सकाळच्या गर्दीच्यावेळी ९१.६ टक्के वक्तशीर होती.

- कुलदीप घायवटमुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील लोकल बिघडलेल्या वेळापत्रकामुळे स्थानकावर उशीरा पोहचत असल्याने प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास १५ ते २० मिनिटांपेक्षा जादा कालावधी लागतो. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा जानेवारी ते जून या सहा महिन्यांपैकी जून महिन्यात लोकलचा वक्तशीरपणा सर्वाधिक कमी आहे. त्यामुळे जून महिन्यांत मध्य रेल्वेवरील प्रवाशांना सर्वाधिक ‘लेटमार्क’ लागला आहे.मध्य रेल्वे मार्गावरील लोकल जून महिन्यात सकाळच्या गर्दीच्यावेळी ९१.६ टक्के वक्तशीर होती. तर, सायंकाळच्यावेळी ९१.५ टक्के वक्तशीर होती. या दोन्ही वेळची सरासरी ९१.१ टक्के असून सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये सर्वाधिक कमी होती. या खालोखाल जानेवारी आणि मे महिन्यांची संपूर्ण महिन्याचा वक्तशीरपणा ९१.९ टक्के आहे. यासह मध्य रेल्वे मार्गावरील लोकल मार्च महिन्यात सकाळच्या गर्दीच्यावेळी ९३.२ टक्के वक्तशीर आणि सायंकाळच्यावेळी ९३ टक्के वक्तशीर होती.या दोन्ही वेळची सरासरी ९३.२ टक्के होती. त्यामुळे जानेवारी ते जून महिन्यांच्या कालावधीमध्ये मार्चमध्ये लोकल सर्वाधिक वक्तशीर होती.गर्दी वाढल्याने होतात अपघातजानेवारी महिन्यात सकाळच्यावेळी ९२.४ टक्के आणि सायंकाळच्यावेळी ९२.६ टक्के होती. या दोन्ही वेळची सरासरी ९१.९ टक्के वक्तशीरपणा होता. फेब्रुवारी महिन्यात सकाळच्यावेळी ९२.४ टक्के, सायंकाळच्यावेळी ९२.८ टक्के होती. या दोन्ही वेळची सरासरी ९२.८ टक्के वक्तशीरपणा होता. मार्च महिन्यात सकाळच्यावेळी ९३.२ आणि सायंकाळच्यावेळी ९३ टक्के वक्तशीर होती. या दोन्ही वेळची सरासरी ९३.२ टक्के वक्तशीर होती. एप्रिल महिन्यात सकाळच्यावेळी ९२.७ टक्के आणि सायंकाळच्यावेळी ९२.३ टक्के वक्तशीर होती. या दोन्ही वेळची सरासरी ९२.२ टक्के वक्तशीर होती. मे महिन्यात सकाळच्यावेळी ९१.६ टक्के आणि सायंकाळी ९१.५ टक्के वक्तशीर होती. या दोन्ही वेळची सरासरी ९१.९ टक्के होती. रेल्वे उशिराने धावत असल्यानेच स्थानकांवर गर्दी वाढून अपघात घडतात, अशी खंत रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केली.

टॅग्स :लोकलमध्य रेल्वे