Join us  

मुंबईत बहुतांश इमारतींत अग्निरोधक यंत्रणेत त्रुटी, १० इमारतींवर कायदेशीर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 3:07 AM

मुंबईतील उत्तुंग इमारती, हॉटेल्स, चित्रपटगृह, मॉल्स, व्यावसायिक इमारतींची गेल्या अडीच वर्षांत केलेल्या झाडाझडतीत ८० टक्के इमारतीमधींल अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त अथवा चांगल्या स्थितीत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. यापैकी बहुतांशी इमारतींनी नोटिशींनंतर अग्निसुरक्षेसाठी आवश्यक बदल करून घेतले आहेत. मात्र, अग्निशमन दलाच्या नोटीसला केराची टोपली दाखविणाºया उर्वरित १० इमारतींच्या पदाधिकाºयांवर खटला दाखल करण्यात आला आहे.

शेफाली परब-पंडितमुंबई : मुंबईतील उत्तुंग इमारती, हॉटेल्स, चित्रपटगृह, मॉल्स, व्यावसायिक इमारतींची गेल्या अडीच वर्षांत केलेल्या झाडाझडतीत ८० टक्के इमारतीमधींल अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त अथवा चांगल्या स्थितीत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. यापैकी बहुतांशी इमारतींनी नोटिशींनंतर अग्निसुरक्षेसाठी आवश्यक बदल करून घेतले आहेत. मात्र, अग्निशमन दलाच्या नोटीसला केराची टोपली दाखविणाºया उर्वरित १० इमारतींच्या पदाधिकाºयांवर खटला दाखल करण्यात आला आहे.मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये उत्तुंग इमारतींची स्पर्धा सुरू झाली. मात्र, या इमारतीमध्ये आग लागल्यानंतर मदतकार्यात अग्निशमन दलास अनेक अडथळे येऊ लागले. त्यामुळे जानेवारी आणि जुलै असे वर्षातून दोन वेळा इमारत किंवा त्या व्यावसायिक आस्थापनाच्या मालकाला अग्निशमन कायदा फॉर्म बी सादर करावा लागतो. यामध्ये आग प्रतिबंधक आणि जीव सुरक्षेसाठी इमारतीतील अग्निरोधक यंत्र दुरुस्त व चांगल्या स्थितीत असल्याचे अग्निशमन दलास कळवावे लागते.त्यानुसार, जानेवारी २०१५ ते सप्टेंबर २०१७ या पावणेतीन वर्षांमध्ये अग्निशमन दलाने ३,७९७ इमारतींची झाडाझडती घेतली. यामध्ये ३,०८७ इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणा कमकुवत, नादुरुस्त अथवा निकामी होती. अशा इमारतींना अग्निशमन दलाने नोटीस पाठविल्यानंतर, ३,०७७ इमारतींनी दिलेल्या मुदतीत इमारतीमधील अग्निरोधक यंत्र कार्यान्वित केली. मात्र, १० इमारतींनी या नोटिशीची दखल घेतली नाही. त्यांच्यावर खटला सुरू असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :आगमुंबई