शिरोशी : मुरबाड तालूक्यातील अवकाळी पावसाच्या फटकेबाजीने सोमवारी शेकडो घरांना उघडेच पाडले. वादळी वाऱ्यासह दाखल झालेल्या पर्जन्यवृष्टीने अनेक गावांमधील घरांच्या कौलांना व पत्र्यांना कागदा सारखे उडवले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रहदारीवर त्याचा परिणाम जाणवला. तालूक्यातील टोकावडे, तळवली, उमरोली, शिरोशी, खुटल, या गावांमध्ये वादळी वारा होऊन अनेक घरांचे कौले उडाले असून शेकडो कु टुंबांना शेजारी आधार घ्यावा लागला. सोमवारी सायकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस पडला. या वेगवान वाऱ्यामूळे अनेक घरांचे पत्रे उडुन गेल्याने घरांमध्ये पाणी साचले होते. या आवकाळी पावसामूळे शेतकरी व वीटभट्टीवाले यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एप्रिल, मे हे महिने लग्नसराईचे म्हणून ओळखले जातात. त्यातच आज मंगळवारी अक्षयतृतिया असल्याने अनेकांनी लग्नाचे मुहूर्त काढले होते. तर त्या अनुषंगाने सोमवारी हळदी समारंभाचे आयोजन होते. मात्र धुवाँधार पावसाने हजेरी लावल्याने नियोजित कार्यक्रमांवर चांगलेच पाणी फिरले. (वार्ताहर)
मुरबाडला धुवाँधार पाऊस
By admin | Updated: April 22, 2015 05:58 IST