Join us  

राज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 5:16 AM

१०,३०९ रुग्ण तर ३३४ मृत्यू : रुग्ण बरे होण्याचा दर ६५.२५ टक्के

मुंबई : राज्यात दिवसभरात १० हजार ३०९ रुग्णांची नोंद झाली, तर ३३४ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या ४ लाख ६८ हजार २६५ आणि बळींचा आकडा १६ हजार ४६७ वर पोहोचला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के असून मृत्यूदर ३.५२ टक्के आहे. बुधवारी ६,१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ३,५,५२१ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

राज्यात सध्या १ लाख ४५ हजार ९६१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ३३४ मृत्यूंमध्ये मुंबई ४२, ठाणे ४, ठाणे मनपा ९, नवी मुंबई मनपा ४, कल्याण डोंबिवली मनपा २३, उल्हासनगर मनपा ७, भिवंडी निजामपूर मनपा १८, मीरा भाईंदर मनपा ४, पालघर २, वसई विरार मनपा ६, रायगड १९, पनवेल मनपा १७, नाशिक १, नाशिक मनपा ९, अहमदनगर ३, धुळे मनपा २, जळगाव ३, जळगाव मनपा १, नंदूरबार ४, पुणे १५, पुणे मनपा ६३, पिंपरी चिंचवड मनपा १४, सोलापूर ९, सातारा ३, कोल्हापूर १२, सांगली १, सांगली मिरज कुपवाड मनपा ६, रत्नागिरी २, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ४, जालना १, लातूर १, लातूर मनपा २, उस्मानाबाद ३, बीड २, नांदेड ३, नांदेड मनपा २, अमरावती १, नागूपर २, नागपूर मनपा ५, वर्धा ३ व अन्य एका रुग्णाचा समावेश आहे.सध्या मुंबईत २०,६७९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईच्या तुलनेत पुणे, ठाण्यात अधिक सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात सध्या ३९,३८५, तर ठाण्यात ३०,४०६ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत २४ लाख १३ हजार ५१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.४० टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ९,३४,६५८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत, तर ३६,४६६ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ८० दिवसांवरमुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे शहर, उपनगरातील रुग्ण दुपटीचा दर ८० दिवसांवर, तर बरे झालेल्या रुग्णांचा दर ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत बुधवारी १,१२५ कोरोनाबाधित आढळले असून ४२ मृत्यू झाले. परिणामी एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १९ हजार २४० झाली असून मृतांचा आकडा ६ हजार ५९१ झाला. मुंबईत आतापर्यंत ९१ हजार ६७३ रुग्ण कोविडमुक्त झाले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई