Join us  

चाळीशीतील व्यक्तींमध्ये अँटीबॉडीज अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2020 6:46 AM

सेरो सर्वेक्षणाचा अहवाल

मुंबई : चाळी व झोपडपट्टीमधील नागरिकांमध्ये सरासरी ४५ टक्के व इमारतींमध्ये सुमारे १८ टक्के अ‍ॅण्टीबॉडीज (प्रतिद्रव्य) तयार झाल्या असल्याचे दुसऱ्या सेरो सर्वेक्षणातून उजेडात आले आहे. आर उत्तर- दहिसर, एम पश्चिम- चेंबूर आणि एफ उत्तर- सायन वडाळा या तीन विभागांमधील झोपडपट्टी आणि इमारतींमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

पहिल्या फेरीत तीनही विभागांतील सर्व वयोगटांमध्ये समान प्राबल्य असल्याचे आढळले होते. मात्र, दुसºया फेरीत हे प्राबल्य ४० पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये काही प्रमाणात अधिक असल्याचे आढळून आले आहे. सर्वेक्षणासाठी संबंधित तीन विभागांतील काही रहिवाशांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. हे सर्वेक्षण नीती आयोग, महापालिका, टाटा इन्स्टिट्यूूट आॅफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरीत्या राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या अभ्यासात कस्तुरबा रेणू जीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रान्सलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट सहयोगी संस्था म्हणून सहभागी आहेत. सर्वेक्षणाची पहिली फेरी जुलैअखेरीस घेण्यात आली होती.पहिल्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये १६ टक्के अ‍ॅण्टीेबॉडीजचे प्राबल्य आढळून आले होते. सप्टेंबरअखेरीस करण्यात आलेल्या दुसºया फेरीत पाच हजार ८४० एवढ्या लक्ष्य नमुन्यांपैकी पाच हजार ३८४ नमुने संकलित करण्यात आले. यामध्ये लक्षणे असलेल्या, बरे झालेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता. तसेच संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या आणि सक्रिय प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींना या अभ्यासातून वगळण्यात आले. 

संबंधित तीन विभागांतील काही रहिवाशांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. हे सर्वेक्षण नीती आयोग, महापालिका, टाटा इन्स्टिट्यूूट आॅफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरीत्या राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या अभ्यासात कस्तुरबा रेणू जीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रान्सलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट सहयोगी संस्था म्हणून सहभागी आहेत. सर्वेक्षणाची पहिली फेरी जुलैअखेरीस घेण्यात आली होती.

पहिल्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये १६ टक्के अ‍ॅण्टीेबॉडीजचे प्राबल्य आढळून आले होते. सप्टेंबरअखेरीस करण्यात आलेल्या दुसऱ्या फेरीत पाच हजार ८४० एवढ्या लक्ष्य नमुन्यांपैकी पाच हजार ३८४ नमुने संकलित करण्यात आले. यामध्ये लक्षणे असलेल्या, बरे झालेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता. संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या आणि सक्रिय प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींना या अभ्यासातून वगळण्यात आले.

महत्त्वाची निरीक्षणे व निष्कर्षच्सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांदरम्यान हेल्थ पोस्ट, दवाखाने, आरोग्य कार्यालय आणि क्षेत्रस्तरावर काम करणाºया व्यक्तींमध्ये सरासरी २७ टक्के अ‍ॅण्टीबॉडीज आढळून आल्या.च्झोपडपट्टी परिसरातील नमुन्यांमध्ये आढळून आलेल्या अ‍ॅण्टीबॉडीजचे प्राबल्य आणि बाधित रुग्णांच्या संख्येचा अभ्यास केल्यास झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे.

महत्त्वाची निरीक्षणे व निष्कर्षसर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांदरम्यान हेल्थ पोस्ट, दवाखाने, आरोग्य कार्यालय आणि क्षेत्रस्तरावर काम करणाºया व्यक्तींमध्ये सरासरी २७ टक्के अ‍ॅण्टीबॉडीज आढळून आल्या.* झोपडपट्टी परिसरातील नमुन्यांमध्ये आढळून आलेल्या अ‍ॅण्टीबॉडीजचे प्राबल्य आणि बाधित रुग्णांच्या संख्येचा अभ्यास केल्यास झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या