Join us

रक्तदानासाठी जास्तीतजास्त लोकांनी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणेतील सर्व घटक, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार, सिव्हिल सर्जन यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेऊन नियमांचे पालन करून, रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

डॉ.शिंगणे म्हणाले, राजकीय पदधिकारी यांनी राजकीय नेत्यांचे वाढदिवस, तसेच थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी व इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. थॅलसेमिया, कॅन्सर रुग्णांसाठी नियमित रक्ताची गरज भासते. दरम्यान, रक्ताचा तुटवडा भासू नये, म्हणून रक्तदात्यांनी पुढे येऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे.

राज्य रक्त संक्रमण परिषद व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रक्त उपलब्धततेसाठी कार्य आराखडा तयार करून सर्वतो प्रयत्न करावेत, असे डॉ.शिंगणे यांनी निर्देश दिले आहेत. रक्तपेढ्यांनी जास्तीतजास्त रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे रक्तपेढ्यांना आवाहन केले आहे.