Join us

मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ७०० हून अधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:10 IST

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध ...

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येने गेल्या दोन महिन्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाबाधितांचे प्रमाण सातशेवर गेले आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांत ७२१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ३ लाख १५ हजार ७५१वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी ११ हजार ४२८ जणांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यांच्या तुलनेत पहिल्यांदाच मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या सातशे पार झाली आहे. सध्या मुंबईत वाढलेल्या ९८ टक्के कोरोनाबाधित केसेस या हायरारकी इमारतीच्या परिसरातील आहेत. दाटीवाटीच्या भागातून, झोपडपट्टीच्या भागातील जास्त केसेस नाहीत.