Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ७ कोटी ३४ लाखांहून अधिक जणांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:06 IST

मुंबई : राज्यात रविवारी १ लाख ४३ हजार ४०५ लाभार्थ्यांचे लसीकरण कऱण्यात आले आहे तर आतापर्यंत राज्यात एकूण ७ ...

मुंबई : राज्यात रविवारी १ लाख ४३ हजार ४०५ लाभार्थ्यांचे लसीकरण कऱण्यात आले आहे तर आतापर्यंत राज्यात एकूण ७ कोटी ३४ लाख ४० हजार २३० लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटांतील २ कोटी ६३ लाख २२ हजार ३७ लाभार्थ्यांनी पहिला डोस, तर ४७ लाख ३६ हजार ५८९ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ३० लाख २७ हजार ९८७ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ३२ लाख ९ हजार ३९७ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात १२ लाख ९३ हजार २१२ आऱोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर १० लाख ५२ हजार १११ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ४२ हजार ८७८ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर १६ लाख ७५ हजार ८१९ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.