Join us  

महाराष्ट्रातील ६० टक्क्यांहून अधिक बालकामगार करतात शेती, क्रायचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 2:25 AM

क्रायचा अहवाल : शिक्षण हक्कापासूनही वंचित

मुंबई : भारतातली काम करणारी बहुतांश बालके केवळ कारखाने, वर्कशॉप येथे किंवा शहरी भागात नोकर म्हणून व रस्त्यावर फिरणारे विक्रेते म्हणून आढळतात, असा समज असला तरी मोठ्या संख्येने बालके म्हणजेच लहान मुले शेतामध्ये काम करत असल्याचे क्राय या संस्थेच्या सर्वेक्षणावरून समोर आले आहे. महाराष्ट्रातील याचे प्रमाण ६०़६७ टक्के आहे़ पीकपाणी किंवा लावणी असो, पिकावर कीटकनाशके फवारणी किंवा खते फवारणी, किंवा शेतावर व लागवडीजवळ जनावरांची काळजी घेणे असो या सगळ्या प्रकारच्या कामांमध्ये लहान मुलांचा समावेश आढळून येत असल्याचे या सर्वेक्षणावरून समोर आले आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील काम करणारी १८ वर्षांखालील तब्बल ६२. ५ टक्के किशोरवयीन मुले शेतीमध्ये किंवा संबंधित उद्योगात राबत असल्याचे समोर आले आहे. बालकामगार म्हणून काम करणाऱ्या एकूण ४० . ३४ दशलक्ष बालकांपैकी व किशोरवयीन मुलांपैकी २५. २३ दशलक्ष मुले शेती क्षेत्रात कार्यरत आहेत.क्राय - चाइल्ड राइट्स अ‍ॅण्ड यू ने केलेल्या २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, शेतीमध्ये काम करणाºया बालकांना सहसा शिकण्याच्या संधीला मुकावे लागते.काम करत असलेल्या ५ ते १९ वर्षे वयोगटातील एकूण ४०.३४ दशलक्ष बालके व किशोरवयीन यांच्यापैकी केवळ ९. ९ दशलक्ष मुले शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, काम करणाºया चार बालकांपैकी तीन बालके शिक्षण हक्कापासून वंचित असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. क्रायच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात शेती क्षेत्रात काम करणाºया बालकांचे प्रमाण ६०. ६७ टक्के आहे. बालकांच्या दृष्टीने विचार करता, शेतीमध्ये काम करणे त्यांच्यासाठी धोकादायकही आहे. कीटकनाशके, शेतीची उपकरणे हाताळणे यामुळे बालकांच्या विकसनशील शरीरावर दीर्घकालीन तीव्र स्वरूपाचा परिणाम होऊ शकतो असे निष्कर्षातून समोर आले आहे.बालकांना काम करण्यास भाग पाडणाºया कारणांवर उपाय शोधणे असे क्रायच्या पॉलिसी अडव्होकसी व रिसर्चच्या संचालक प्रीती महारा यांनी सांगितले. बाजारात स्वस्त कामगारांना मागणी असल्यानेही बालके काम करतात. त्यांना दीर्घ काळ काम करायला लावले की ते शाळेत जाण्याची शक्यता धुसर होऊ लागलायचे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :मुंबईशेतकरी