Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आतापर्यंत ४ कोटी १२ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:05 IST

मुंबई : राज्यात शनिवारी ३ लाख ४० हजार ८६९ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण ४ कोटी ...

मुंबई : राज्यात शनिवारी ३ लाख ४० हजार ८६९ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण ४ कोटी १२ लाख १ हजार २६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी ३६ लाख २ हजार ४७० जणांना पहिला डोस, तर ४ लाख ५३ हजार ७ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ७५ लाख ९५ हजार ६४८ जणांना लसीचा पहिला डोस, तर ७३ लाख ८९ हजार २९८ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत १२ लाख ८५ हजार ३९२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस, तर ८ लाख ९६ हजार ४७६ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. २१ लाख १३ हजार ४१९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ११ लाख ५ हजार ३१६ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.