लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात ३ लाख ६३ हजार ७६५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर १८ ते ४४ वयोगटातील एकूण ३ लाख ८ हजार १७१ जणांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत राज्यात एकूण १ कोटी ७७ लाख १७ हजार २४२ लाभार्थ्यांनी लस घेतली.
राज्यात एकूण ११ लाख २२ हजार ८२९ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला, तर ६ लाख ६२ हजार ४९७ आराेग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. १४ लाख ८८ हजार ७०२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ६ लाख ४ हजार ८०६ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. सामान्य नागरिकांमध्ये आतापर्यंत १ कोटी १८ लाख ६६ हजार १४५ लाभार्थ्यांन पहिला डोस, तर १९ लाख ७२ हजार २६३ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
जिल्हालाभार्थी
मुंबई २६,८४,९९८
पुणे २४,२८,७५१
ठाणे १३,९२,८२३
नागपूर १०,७८,४१४
नाशिक ८,११,०२५
...................................