Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओहोटीमुळे मोरा-भाऊचा धक्का सागरी वाहतूक पाच दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:13 IST

मोरा मोरा-भाऊचा धक्का या जलद आणि शॉर्टकट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागरी मार्गावरून दररोज कोरोना काळातही हजारो प्रवासी प्रवास करीत ...

मोरा मोरा-भाऊचा धक्का या जलद आणि शॉर्टकट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागरी मार्गावरून दररोज कोरोना काळातही हजारो प्रवासी प्रवास करीत आहेत. सध्या मोरा बंदरात गाळ साचल्याने आणि समुद्राच्या ओहोटीमुळे प्रवासी बोटी जेट्टीपर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी, ओहोटी दरम्यान या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक काही काळासाठी बंद ठेवावी लागते. उधाणाच्या ओहोटीत प्रवासी वाहतूक बंद पडणे ही बाब आता प्रवाशांच्याही अंगवळणी पडली आहे. मात्र यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते.

मोरा-भाऊचा धक्का प्रवासी वाहतूक वेळापत्रक

११ जानेवारी दुपारी २.०० ते संध्या.५.०० वाजेपर्यंत बंद

१२ जानेवारी दुपारी २.०० ते संध्या. ६.०० वाजेपर्यंत बंद

१३ जानेवारी दुपारी ३.०० ते संध्या. ६.४५ वाजेपर्यंत बंद

१४ जानेवारी दुपारी ३.३० ते संध्या. ७.१५ वाजेपर्यंत बंद

१५ जानेवारी दुपारी ४.००. ते संध्या. ७.१५ वाजेपर्यंत बंद