Join us

आयआयटीच्या कॅम्पसमध्ये ‘मूड इंडिगो’चा जल्लोष सुरू

By admin | Updated: December 19, 2015 02:51 IST

तरुणाईची कलाकौशल्ये आणि उत्साह यांचा प्रत्यय देणाऱ्या आयआयटी ‘मूड इंडिगो’ फेस्टला शुक्रवारी दणक्यात सुरुवात झाली. एरव्ही अभ्यासात गढून जाणारे ‘आयआयटीएन्स’

- लीनल गावडे,  मुंबईतरुणाईची कलाकौशल्ये आणि उत्साह यांचा प्रत्यय देणाऱ्या आयआयटी ‘मूड इंडिगो’ फेस्टला शुक्रवारी दणक्यात सुरुवात झाली. एरव्ही अभ्यासात गढून जाणारे ‘आयआयटीएन्स’ ‘मूड इंडिगो’च्या धम्माल मस्तीत मग्न झालेले दिसले. फेस्टमध्ये पुढचे तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. देशभरातील आयआयटीएन्स मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी ‘देसी बिट्स’ या नृत्य स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी नव्या-जुन्या गाण्यांवर धमाकेदार नृत्ये सादर केली. फेस्ट पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी ‘पिलो फाईट’, सेल्फी विथ प्राप्ज या इव्हेंट्सना गर्दी केली होती. म्युझिक बॅण्डची जुगलबंदी असलेला ‘हिस्टेरिया’, ‘लॅण्ड झोरबिंग’, ‘पेंट बॉल’, ‘लेझर मेझ’ या खेळांनाही तरुणांनी पसंती दिली.विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये वाजणाऱ्या गाण्यांचा तालावर ठेका धरला. फ्री डान्सचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. या जल्लोषामुळे संपूर्ण कॅम्पस ‘फन मूड’मध्ये न्हाऊन निघाले. फेस्टचे पुढचे तीन दिवस ही धमाल आणखी वाढत जाणार आहे. फॅशन का जलवा मूड इंडिगोत तरुणींचा ‘फॅशन जलवा’ पाहायला मिळाला. अगदी शॉर्ट डेनिमपासून ते पार्टीवेअर ड्रेसेसपर्यंतची विविधता यात होती. यात तरुणही मागे नव्हते. मुलांची विविध जॅकेट्स, गॉगल्स आणि फंकी हेअरस्टाईल्सची चर्चा कॅम्पसमध्ये होती. सेल्फी वॉल्सआयआयटीचे कॅम्पस विद्यार्थ्यांनी सुरेख सजवले होते. अनेक भिंतींवर चित्रे रेखाटण्यात आली होती. या रंगीबेरंगी भिंती विद्यार्थ्यांसाठी ‘सेल्फी वॉल’ ठरल्या. तिथे उभारण्यात आलेला वाळूचा किल्लाही लक्षवेधक होता.