Join us

Monsoon Update: परतीचा पाऊस महाराष्ट्राच्या वेशीवर

By सचिन लुंगसे | Updated: October 4, 2024 22:46 IST

Monsoon Update: पंजाबसह राजस्थानतून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडील माहितीनुसार, मान्सून माघार घेण्यास अनूकुल परिस्थिती तयार झाली असल्याने दोन ते तीन दिवसांत राज्याच्या काही भागातून मान्सून माघार घेईल.

मुंबई - पंजाबसह राजस्थानतून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडील माहितीनुसार, मान्सून माघार घेण्यास अनूकुल परिस्थिती तयार झाली असल्याने दोन ते तीन दिवसांत राज्याच्या काही भागातून मान्सून माघार घेईल. तर मुंबईमध्ये परतीच्या पावसाचे आगमन मंगळवारदरम्यान होईल, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली.

मुंबईसह राज्यभरात शनिवारसह रविवारपासून परतीच्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवारपासून राज्यात परतीचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मुंबईसह आसपासच्या परिसरात मात्र मंगळवारपासून परतीच्या पावसाला सुरुवात होईल. मंगळवारपासून शनिवारपर्यंत परतीचा पाऊस मुंबई शहर आणि उपनगरासह लगतच्या परिसरात दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह सुरु होईल. शक्यता दुपारनंतर परतीच्या पावसाचे वातवरण तयार होईल आणि सायंकाळी परतीचा पाऊस पडेल, असे हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :मोसमी पाऊसपाऊस