Join us
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनने महाराष्ट्र व्यापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस घेऊन आलेल्या मान्सूनने गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याची घोषणा भारतीय हवामान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस घेऊन आलेल्या मान्सूनने गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली. तत्पूर्वी मान्सून बुधवारी मुंबई, ठाणे, पालघरसह नागपूरमध्ये दाखल झाला होता. याच काळात त्याने केलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेली होती.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मान्सून गुरुवारी आणखी काही पुढे सरकला आहे. गुरुवारी मान्सून गुजरातच्या काही भागात, महाराष्ट्राच्या काही भागात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशच्या दक्षिण भागात, छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशाच्या काही भागात दाखल झाला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सुरत, नंदुरबार, बेतूल, मंडाला, बिलासपूर, बोलांगिर, पुरीवर होती. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठीदेखील हवामान साजेसे आहे. येत्या ४८ तासांत मान्सून देशाच्या उत्तरी भागात आणखी वेगाने दाखल होईल.

..................................