Join us  

मान्सूनची विश्रांती; पण लाटांचे तांडव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 6:54 PM

मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी मनसोक्त बरसलेल्या मान्सूनने शुक्रवारसह शनिवारी विश्रांती घेतली...

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी मनसोक्त बरसलेल्या मान्सूनने शुक्रवारसह शनिवारी विश्रांती घेतली असतानाच समुद्रात मात्र लाटांचे तांडव सुरुच होते. विशेषत: मरिन ड्राइव्हच्या समुद्र किनारी मोठया प्रमाणावर लाटा उसळत होत्या. परिणामी समुद्र किनारी मुंबईकरांनी जाऊ नये, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, जुलै महिन्यात ८ दिवस ४ मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळतील. ऑगस्ट महिन्यात ४ दिवस आणि सप्टेंबर महिन्यात ५ दिवस ४ मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळतील.मान्सूनची वाटचाल मध्य प्रदेशाच्या आणखी काही भागात, पूर्व मध्य प्रदेशाच्या बहुतांश भागात, पूर्व उत्तर प्रदेशाच्या आणखी काही भागात कायम आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. २१ जून रोजी कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना होईल. २२ आणि २३ जून रोजी कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

 

टॅग्स :मानसून स्पेशलमुंबई