Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोनोचे रिटर्न तिकीटही मिळणार !

By admin | Updated: October 28, 2014 01:42 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आता मोनोच्या प्रवाशांना रिटर्न तिकीट सोमवारपासून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : चेंबूर ते वडाळा या मार्गावर धावणा:या मोनो रेल्वेच्या प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आता मोनोच्या प्रवाशांना रिटर्न तिकीट  सोमवारपासून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सह प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले, की आता वडाळा-चेंबूर-वडाळा या मोनोरेल मार्गावर मुंबईकरांसाठी रिटर्न तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ज्या अंतराचे रिटर्न तिकीट हवे असेल त्यासाठी दुप्पट रक्कम मोजून प्रवासी रांगेत उभे राहण्याची गैरसोय टाळू शकतील. सद्य:स्थितीमध्ये वडाळा ते चेंबूर अंतरासाठी 11 रुपये मोजावे लागत असून, याच मार्गावरील रिटर्न तिकिटासाठी प्रवाशांना 22 रुपये मोजावे लागणार आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी मोनोरेल मार्गावरील सर्व स्थानकांवर रिटर्न तिकिटासंबंधी सूचना लावण्यात आल्या आहेत. शिवाय त्यानुसार सर्व स्थानकांवर उद्घोषणाही करण्यात येत आहे. मोनो मार्गावर रिटर्न तिकीट प्रथमच उपलब्ध होत आहे. त्यामुळे सर्व स्थानकांवर प्रवाशांना यासंबंधी अधिक माहिती मिळावी म्हणून अतिरिक्त माहिती साहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, मोनोरेलच्या सर्व स्थानकांवरील तिकीटघरे सकाळी 5.5क् पासून रात्री 1क् वाजेर्पयत खुली असतील. सर्व स्थानके रात्री 1क् वाजता प्रवाशांसाठी बंद होतील. आणि मुंबई मोनोरेलच्या इतर सर्व सेवासुविधा नेहमीप्रमाणो सुरू राहतील. (प्रतिनिधी)
 
प्रवाशांनो हे लक्षात ठेवा़़़
च्परतीच्या प्रवासासाठी तेच 
टोकन जपून ठेवा. खरेदी केलेल्या दिवसापुरतीच परतीच्या टोकनची वैधता आहे.
च्परतीच्या प्रवासाची टोकनची पावती मागून घ्या आणि खरेदीचा पुरावा म्हणून जपून ठेवा. हरवलेल्या टोकनची बदली म्हणून पावती वापरता येणार नाही. न केलेल्या प्रवासाचे भाडे परत केले जाणार नाही.
च्गंतव्य स्थानकातून बाहेर पडताना परतीच्या प्रवासासाठी कपमधून टोकन गोळा करा. गंतव्य स्थानकातून बाहेर न पडता; सुरुवातीच्या स्थानकात परत आल्यास दंड होईल.
च्परतीचा प्रवास तुम्ही टोकन 
खरेदी केलेल्या स्थानकार्पयतच मर्यादित आहे. त्यापलीकडे प्रवास केल्यास तो अतिरिक्त मानला जाऊन दंड होऊ शकतो.