जमीर काझी -मुंबई
मोनो-2 रेल्वे प्रकल्पामधील महत्त्वाचा अडसर असलेल्या कामाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. करी रोड स्टेशन रुळावरून बीम उभारण्याच्या प्रस्तावाला रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाने (सीआरएस) मंजुरी दिली आहे. यापूर्वी प्रस्तावातील नियोजन व रेखांकन त्रुटी असल्याने गेल्या 6 महिन्यांपासून हे काम रेंगाळलेले होते.
करी रोड स्टेशनवरील रेल्वे रुळावर स्ट्रर उभारण्यासाठी सीआरएसने मंजुरी दिलेले पत्र नुकतेच मिळाले आहे. त्यानुसार पुढच्या महिन्यात कामाला सुरुवात करण्याचे नियोजन असून पुढील वर्षाच्या मेर्पयत त्याची पूर्तता करण्याचा प्रय} आहे, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वरिष्ठ अधिका:यांकडून सांगण्यात आले. चेंबूर ते वडाळा मार्गावरील मेट्रो रेल्वे गेल्या फेब्रुवारीपासून कार्यरत असून, वडाळा ते जेकब सर्कल मार्गावरील दुस:या टप्प्यातील कामासाठी 31 डिसेंबर 2915 र्पयत डेडलाइन ठरविण्यात आली आहे. मोनो-1ला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने रोज प्राधिकरणाला 2 लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे चेंबूर ते जेकब सर्कलर्पयतचा 19.5 किलोमीटर अंतर लांबीचा पूर्ण प्रकल्प लवकर कार्यन्वित करून तोटा भरून काढण्याचा प्रय} करण्यात येत आहे.
सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘सीआरएस’ने गेल्या जूनमध्ये प्राधिकरणाने पाठविलेला पहिला प्रस्ताव नामंजूर करून परत पाठविला होता. कारण त्यामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनल्स ते कुर्ला जंक्शनर्पयतच्या मार्गामधील सहाव्या व सातव्या मार्गिकेवर (लाइन) पुरेसे अतिरिक्त रेखांकन करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे प्राधिकरणाने नव्याने या दोन्ही मार्गिकांवर योग्य अंतर ठेवून नव्याने प्रस्ताव पाठविला होता, त्याला सुरक्षा आयुक्तालयाने मंजुरी दिली आहे. यामध्ये मोनोच्या मार्गावर आधारासाठी वडाळा स्टेशनर्पयत बीम टाकावयाचे आहे.
मोनो-2 च्या प्रकल्पात आर्थर रोड जेलजवळील मार्गाचे काम प्रलंबित आहे. त्या ठिकाणी मोनोतून प्रवाशांना कारागृहाच्या आतील दृश्य दिसू नयेत, या दृष्टीने काम करावयाचे आहे. वडाळा डेपो ते जेकब सर्कल (संत गाडगे महाराज चौक) या मार्गावरील 8.8क् किलोमीटर अंतराचा मोनोचा दुसरा टप्पा आहे. त्याची पूर्तता डिसेंबर 2क्15 र्पयत करायची आहे.