Join us

नागरी निवारा परिषद येथे माकडांचा उच्छाद, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST

मुंबई : गोरेगाव दिंडोशी नागरी निवारा परिषद येथील प्लॉट नं. 5/1 अनुराधा सोसायटीच्या इमारतीत माकडाचा मोठ्या प्रमाणात वावर वाढल्याने ...

मुंबई : गोरेगाव दिंडोशी नागरी निवारा परिषद येथील प्लॉट नं. 5/1 अनुराधा सोसायटीच्या इमारतीत माकडाचा मोठ्या प्रमाणात वावर वाढल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माकडांच्या दहशतीने तर लहान मुले व वरिष्ठ नागरिकदेखील बाहेर पडत नाहीत.

सदर सोसायटी ही नाल्यालगत असून, त्यासमोर मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. त्यामुळे येथे गेले तीन चार दिवस 10 ते 15 माकडे येऊन नागरिकांच्या घरातील वस्तूंचे नुकसान करीत आहेत. शोभेची झाडे कुंड्या सेफ्टी ग्रिलमधून हात घालून माकडे घरातील वस्तू लंपास करत आहेत. त्यांच्या या उपद्रवामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत.

याप्रकरणी स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी जातीने लक्ष घालून वनखात्याकडून येथे पिंजरे लावून येथील माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप राजापूरकर यांनी केली आहे.