Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघात रोखण्यास मोनिकाचा पुढाकार

By admin | Updated: September 27, 2016 04:07 IST

लोकल अपघातात रोज सात ते आठ जणांना प्राण गमवावे लागतात. हे अपघात रोखण्यासाठी कशी काळजी घ्यावी, यासंदर्भात आरपीएफ पोलिसांनी सोमवारी घाटकोपर रेल्वे

मुंबई : लोकल अपघातात रोज सात ते आठ जणांना प्राण गमवावे लागतात. हे अपघात रोखण्यासाठी कशी काळजी घ्यावी, यासंदर्भात आरपीएफ पोलिसांनी सोमवारी घाटकोपर रेल्वे स्थानकात जनजागृती मोहीम राबविली. या वेळी रेल्वे अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरे यांनी प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन रेल्वे रूळ न ओलांडण्याचे आवाहन केले. गेल्या काही वर्षांत मुंबईमध्ये रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लोकल गाड्यांना नेहमीच मोठी गर्दी असते. कामावर लवकर जाण्याच्या घाईत अनेक जण चालत्या लोकलमधून पडतात. शिवाय अनेक रहिवासी आणि प्रवासी पादचारी पुलांचा वापर न करता रेल्वे ट्रॅक पार करतात. असे करताना लोकलची धडक लागून आजवर अनेकांचे प्राण गेले आहेत. अनेकांना अपंगत्वदेखील आले आहे. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकातदेखील मोठ्या प्रमाणात प्रवासी रेल्वे ट्रॅक पार करतात. त्यामुळे या प्रवाशांना समज देण्यासाठी घाटकोपर आरपीएफचे पोलीस निरीक्षक ब्रिजेश कुमार यांनी आज या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी रेल्वे ट्रॅक पार करणाऱ्या प्रवाशांना मोनिका मोरेंच्या हस्ते गुलाबाचे फुल देण्यात आले. तसेच या वेळी आम्ही पुन्हा ट्रॅक ओलांडणार नाही, अशी शपथदेखील या प्रवाशांनी पोलिसांसमोर घेतली. (प्रतिनिधी)