मुंबई : सहार परिसरात एका पाच वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर आरेच्या जंगलात बलात्कार करण्याची घटन ताजी असतानाच, गेल्या आठवड्यात पुन्हा याच परिसरातून एका सात वर्षीय मुलीचे दोन तरु णांनी रिक्षात बसवून अपहरण केले. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे या मुलीची सुटका झाली. मात्र दोघे अपहरणकर्ते फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.गेल्या आठवड्यात सायंकाळी ही मुलगी घराबाहेर खेळत असताना एक रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने या मुलीला जबरदस्तीने रिक्षात डांबले आणि बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर सहार परिसरातच या मुलीला मारहाण करताना तिच्या शेजारी राहणाऱ्या एका स्थानिकाने पाहिले आणि त्याने त्याच्या काही मित्रांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला मुलीच्या घराजवळ आणले. मात्र दोघेही पसार झाले. त्यानंतर सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला असल्याचे सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ प्रकाश मर्दे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सात वर्षीय मुलीचे अपहरण करून विनयभंग
By admin | Updated: April 2, 2015 02:42 IST