रोहा : रोहा तालुक्यातील बांदोली गावाजवळ आदिवासी वाडीत राहणाऱ्या रवी दौलत वाघमारे या आदिवासी व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा (१३) विनयभंग केला. याप्रकरणी रोहा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित मुलगी बांदोलीतून एकटी जात असताना आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन केले. दोन महिन्यापूर्वी देखील आरोपीने अशा प्रकारचे कृत्य केल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.
बांदोलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By admin | Updated: December 24, 2014 22:33 IST