Join us

वाशीत विदेशी महिलेचा विनयभंग

By admin | Updated: February 13, 2015 04:44 IST

मित्राच्या लग्नासाठी न्यूझीलंडवरून नवी मुंबईत आलेल्या विदेशी महिलेचा कापड दुकानातील कामगाराने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नवी मुंबई : मित्राच्या लग्नासाठी न्यूझीलंडवरून नवी मुंबईत आलेल्या विदेशी महिलेचा कापड दुकानातील कामगाराने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाशी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून संबंधित कामगारास अटक करण्यात आली आहे. वकील असलेली ही महिला मित्राचे लग्न असल्यामुळे नवी मुंबईत पोषाख खरेदीसाठी आली आहे. ती मंगळवारी दुपारी वाशी सेक्टर १७ मधील एका दुकानामध्ये गेली होती. कामगाराने मापे घेण्याच्या बहाण्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. सदर महिलेने तत्काळ याविषयी वाशी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली आहे. पोलिसांनी संबंधीत कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. त्याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम पाठारे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)