Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोदी देशाचे की गुजरातचे पंतप्रधान?

By admin | Updated: September 19, 2014 02:27 IST

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की केवळ गुजरातचे असा प्रश्न देशवासियांना पडला आहे.

मुंबई : नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की केवळ गुजरातचे असा प्रश्न देशवासियांना पडला आहे. केवळ गुजरातमध्ये परदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी पंतप्रधानांचे दौरे आयोजित करण्यात येत आहेत का, असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे. 
पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नैपाळ दौ-यावर गेले आणि गुजरातमधील अदानींच्या कंपनीला फायदा झाला. चीन, जपानसोबत चर्चा करुन ते गुजरातमध्ये विदेशी गुंतवणूक आणत आहेत. केवळ गुजरातचे नाही तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान असल्याचा त्यांना विसर पडला आहे, असा टोलाही मलिक यांनी आणला.  सीमेवर चीनी, पाकिस्तानी सैन्याच्या कुरघोडय़ा चालू असताना चर्चा करु नये, अशी भूमिका मोदींनी निवडणूकीपूर्वी घेतली होती. आता मात्र ते नरमाईची भूमिका घेत असल्याची टीका मलिक यांनी केली.
 
हिंदी भाषिक कार्यकत्र्यासाठी पक्षांतर्गत हिंदी भाषिक सेलची आज स्थापना करण्यात आली. तर, रमेश साळवे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला बिशर्त पाठिंबा दिल्याची माहिती मलिक यांनी दिली.