तलासरी : भाजपा सरकार हे भांडवलदारांचे सरकार असून गरीबांच्या कल्याणाचे निर्णय न घेता ते भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेत आहे. भाजपा सरकारमध्ये महागाई कमी न होता वाढतच आहे. आदिवासींवर अन्याय होत असल्याचा आरोप अशोक ढवळे, लहानू कोम यांनी केला. तलासरी नाक्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे सोमवारी जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मार्क्सवादी कार्यकर्त्यांसह राज्य सचिव अशोक ढवळे, जनवादी महिला संघटनेच्या मरियम ढवळे, माजी खासदार लहानू कोम, किशोर ठेकेदत्त, जीवा पांडु गावीत उपस्थित होते.या सभेत तलासरी पंचायत समितीचे सभापती वनशा दुमाडा तसेच जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या वर्षी माकपा मधून फुटून वेगळे झालेल्या काहीजण परत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात आले. त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तलासरीत ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)
मोदी सरकार भांडवलदारधार्जिणे
By admin | Updated: March 9, 2015 22:53 IST