मुंबई : चित्रपटात काम देण्याचे आमिष देऊन एका मॉडेलचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार सांताक्रुझमध्ये घडला. याबाबत पीडित मॉडेलने सोमवारी सायंकाळी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून, पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.काही महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या इसमाने पीडित मॉडेलला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे दोघे वारंवार भेटत होते. सोमवारी सांताक्रुझ पश्चिमेकडील सी प्रिन्सेस हॉटेलमध्ये सदर इसमाने तिला भेटण्यासाठी बोलविले. भेट झाल्यानंतर संबंधित इसम तिला हॉटेलमधील एका रूममध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी संबंधित इसमाने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. तसेच या प्रकारची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार या मॉडेलने केली आहे. (प्रतिनिधी)
सांताक्रुझमध्ये मॉडेलचा विनयभंग
By admin | Updated: February 3, 2016 03:17 IST