लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मॉडेल कृतिका चौधरी (२५) हिच्या हत्येप्रकरणी पंचवीसहून अधिक जणांची चौकशी गुन्हे शाखेने केली आहे. मात्र अजूनही काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दरम्यान, या इमारतीत काम करणाऱ्या जुन्या सुरक्षारक्षकाला अंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कृतिकाच्या हत्येप्रकरणी ती राहत असलेल्या इमारतीत काम करणाऱ्या जुन्या सुरक्षारक्षकाची अंबोली पोलीस चौकशी करत आहेत. त्याला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशला गेले होते. मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गुन्हे शाखेने वीस ते पंचवीस जणांची या प्रकरणी चौकशी केली आहे. यात काही ड्रग पेडलर्सचा समावेश आहे. मात्र त्यांच्याकडून पोलिसांच्या हाती निराशाच आली आहे. या प्रकरणी काही तांत्रिक बाबी पोलीस पडताळून पाहत आहेत.
मॉडेल हत्याप्रकरण : सुरक्षारक्षक ताब्यात
By admin | Updated: June 17, 2017 02:28 IST