Join us

मोबाइल टॉवरला ग्रामस्थांचा विरोध

By admin | Updated: July 13, 2015 22:41 IST

तालुक्यातील केगाव ग्रा. पं. च्या हद्दीत थळी यांच्या घराच्या टेरेसवर उभारण्यात येत असलेला फोर जी इंटरनेट टॉवरला स्थानिक ग्रामस्थ, नागरिकांनी विरोध दर्शविला आहे

उरण : तालुक्यातील केगाव ग्रा. पं. च्या हद्दीत थळी यांच्या घराच्या टेरेसवर उभारण्यात येत असलेला फोर जी इंटरनेट टॉवरला स्थानिक ग्रामस्थ, नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. ग्रामपंचातयीनेही कामाला परवानगी नाकारली आहे. या अनधिकृत मोबाइल टॉवरला विद्युत पुरवठा करू नये, अशी लेखी तक्रारवजा मागणी केगाव ग्रामपंचायतीने उरण वीज मंडळाकडे केली आहे.केगाव ग्रा. पं. च्या हद्दीत थळी यांच्या घर क्र. ६९२ च्या टेरेसवर घर मालकाने मोबाइल टॉवर उभारण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार असल्याच्या भीतीमुळे परिसरातील स्थानिक ग्रामस्थ, नागरिक यांनी मोबाइल टॉवर उभारणीला विरोध केला आहे. ग्रामसभेतही तसा ठराव घेण्यात आला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे रिलायन्सच्या या फोर जी इंटरनेट टॉवर उभारणीला ग्रा. पं. नेही परवानगी नाकारली आहे. शिवाय स्थानिकांच्या विरोधाची दखल घेवून ग्रा.पं. नेही या अनधिकृत मोबाइल टॉवरला विद्युत पुरवठा करू नये, अशी मागणी केगाव ग्रा.पं.ने उरण वीज मंडळाकडे केली असल्याची माहिती केगाव सरपंच हेमांगी ठाकूर यांनी दिली. मोबाइल टॉवर्समधून निघणाऱ्या लहरी आरोग्यास हानिकारक असतात. त्याचे परिणाम दीर्घकालीन असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)